पुण्यात बाजीराव रोडवर श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन
पुणे, 25 मार्च, (हिं.स.)। अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती, ट्रस्ट पुणे यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.गुरुवार, दिनांक २६ मार्च २०
पुण्यात बाजीराव रोडवर श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन


पुणे, 25 मार्च, (हिं.स.)। अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती, ट्रस्ट पुणे यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत प्रभू श्रीरामांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, तसेच आकर्षक देखावे यामुळे शोभायात्रा लक्षवेधी ठरणार आहे.

ही शोभायात्रा हुजूरपागा, बाजीराव रोड, पुणे येथून सुरू होणार असून, मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक भावना दृढ करण्याबरोबरच सामाजिक एकात्मता वाढविण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.कार्यक्रमास नागरिकांनी मित्रपरिवारासह आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक अमर भालेराव (तात्या) यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande