छ. संभाजीनगर - राजू राठोड यांची शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुखपदी निवड
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी राजूभाऊ राठोड यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांकडून देण्
Raju Rathod Appointed as Shiv Sena (Shinde) District Chief


छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी राजूभाऊ राठोड यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

राठोड हे दीर्घकाळ पक्ष संघटनात्मक कामात सक्रिय असून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क मजबूत मानला जातो. आगामी काळात जिल्ह्यात पक्षविस्तार, संघटन बांधणी आणि विविध राजकीय उपक्रमांवर भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande