छ. संभाजीनगर - सुटीच्या दिवशीही रजिस्ट्री कार्यालय खुले
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)। ३१ मार्चपूर्वी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भातील नोंदणी करण्यासाठी नागरिक मुद्रांक शुल्क व नोंदणी (रजिस्ट्री) कार्यालयात गर्दी करतात. ३१ मार्चनंतर रेडीरेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून ही गर्
छ. संभाजीनगर - सुटीच्या दिवशीही रजिस्ट्री कार्यालय खुले


छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)। ३१ मार्चपूर्वी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भातील नोंदणी करण्यासाठी नागरिक मुद्रांक शुल्क व नोंदणी (रजिस्ट्री) कार्यालयात गर्दी करतात. ३१ मार्चनंतर रेडीरेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून ही गर्दी दरवर्षी होते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सुटीच्या दिवशीही दुय्यम निबंधक रजिस्ट्री कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीन तर बीड बायपास भागात दोन अशी पाच दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. एक एप्रिलला रेडीरेकनरचे दर जाहीर होतात. यंदा दरात वाढ होणार असल्याची चर्चा रजिस्ट्री कार्यालयात रंगली आहे, असे असले तरी यासंदर्भात३१ मार्च नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. रेडीरेकनच्या दरात वाढ झाल्यास अधिक शुल्क भरावे लागणार असल्याचे भीतीने एप्रिल महिन्याआधीच मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण व्हावेत, म्हणून विविध प्रकारच्या दस्तांच्या नोंदणीसाठी नागरिक मार्च महिना सुरू होताच नोंदणी कार्यालयात गर्दी होते.२८ व २९ मार्चला नोंदणी सुरू राहणार आहे शनिवार, रविवारसह अन्य शासकीय सुटीच्या दिवशीदेखील नोंदणी व मुद्रांक कार्यालय सुरू राहतील

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande