संतोष देशमुख हत्या प्रकरण : खटला मागे घेण्यासाठी कुटुंबावर दबाव, जीवे मारण्याच्या धमक्या
बीड, 25 मार्च (हिं.स.)। येथील विशेष सत्र न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यानंतर पीडित कुटुंबाने खळबळजनक आरोप केले आहेत. खटला मागे घेण्यासाठी आणि कायदेशीर लढा कमकुवत करण्यासाठी अज्ञात क्रमांकावरून सतत धमक्यांचे फोन ये
अ


बीड, 25 मार्च (हिं.स.)। येथील विशेष सत्र न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यानंतर पीडित कुटुंबाने खळबळजनक आरोप केले आहेत. खटला मागे घेण्यासाठी आणि कायदेशीर लढा कमकुवत करण्यासाठी अज्ञात क्रमांकावरून सतत धमक्यांचे फोन येत असल्याचा दावा मृत संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर केला आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून झालेल्या या निर्घृण हत्येचा तपास सीआयडी करत असतानाच आता पीडित कुटुंबाला दहशतीच्या छायेत जगावे लागत आहे.

न्यायालयातील सुनावणीदरम्यान आरोपी क्रमांक ३ ते ७ यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच गेल्या १४ महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याच्यावर सीआयडीने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. या गंभीर प्रकरणात सर्व आरोपींवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खंडणीखोर प्रवृत्तीला विरोध केल्यामुळे झालेल्या या हत्येप्रकरणी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande