
परभणी, 25 मार्च (हिं.स.)।
श्रीराम नवमी व हिंदू एकता दिवसाच्या निमित्ताने गुरुवार 26 मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने परभणी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मागील 13 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षीही उत्साहात पार पडणार असून ही शोभायात्रा गुरुवार 26 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शनिवार बाजार दरम्यान निघणार आहे. या भव्य शोभायात्रेत श्रीराम प्रभूंची आकर्षक पालखी, भव्य श्रीराम मूर्ती, खाटू श्याम महाराज देखावा, हलगी पथक तसेच विविध पारंपरिक मर्दानी खेळ सादर करण्यात येणार आहेत. याशिवाय यंदा विशेष आकर्षण म्हणून केरळ येथील भव्य हनुमान मूर्ती, सोलापूर येथील प्रसिद्ध लेझीम पथक आणि दिल्ली येथील महाकाली पथक सहभागी होणार असल्याने शोभायात्रेला विशेष धार्मिक व सांस्कृतिक रंगत प्राप्त होणार आहे.
दरम्यान, या धार्मिक सोहळ्यात कुटुंबासह उपस्थित राहून हिंदू ऐक्याचे दर्शन घडवावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी सर्व श्रीराम भक्तांना केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis