सोलापूर - सैफुलच्या डांबरी रस्त्यावरच टाकला मुरूम
सोलापूर, 25 मार्च, (हिं.स.)। सैफुल परिसरातील रस्त्यावर ड्रेनेजचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून खोदलेला मुरूम डांबरीकरण रस्त्यावरच टाकण्यात आलेला आहे. या पडलेल्या मुरूममुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी अडथळा होत असून यामुळे येथे अपघाती घटना घडण्याची
सोलापूर - सैफुलच्या डांबरी रस्त्यावरच टाकला मुरूम


सोलापूर, 25 मार्च, (हिं.स.)। सैफुल परिसरातील रस्त्यावर ड्रेनेजचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून खोदलेला मुरूम डांबरीकरण रस्त्यावरच टाकण्यात आलेला आहे. या पडलेल्या मुरूममुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी अडथळा होत असून यामुळे येथे अपघाती घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर पडलेला मुरूम उचलून अन्यत्र टाकण्याची गरज आहे.

विजापूर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतुक होत असून याच रस्त्यावर एका मंगल कार्यालयाच्या जवळ ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करत असलेल्या ठेकेदाराकडून ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यातील मुरूम हा पदपथावर टाकण्यात आला आहेच. शिवाय, डांबरीकरणाच्या रस्त्यावरही टाकण्यात आला आहे. येथे पडलेल्या या मुरूममुळे येथून ये-जा करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांना अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या या मुरूममुळे या रस्त्यावर अपघाती घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande