नांदेड : राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची पहिली बैठक संपन्न
नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणीची पहिली बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगाप्पा किन्नूर यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक कलबुर्गी येथे घेण्यात आली. या बैठकिला मार्गदर्शक म्हणून पक्षाचे संस्थापक महादेव जानकर उपस्थित ह
नांदेड : राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची पहिली बैठक संपन्न


नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणीची पहिली बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगाप्पा किन्नूर यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक कलबुर्गी येथे घेण्यात आली. या बैठकिला मार्गदर्शक म्हणून पक्षाचे संस्थापक महादेव जानकर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना महादेव जानकर म्हणाले, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकत्यांनी बुथ पातळीवर पर्यंत कार्यकर्त्याची फळी व युवा आघाडी, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, किसान आघाडी व इतर आघाड्या उभे करावे लागेल आणि यांच्या माध्यमातून लोकाभिमुख प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक पदाधिकारी पक्षाचे सक्रिय सभासद असणे आवश्यक आहे, आणि पक्षाचे जास्ती जास्त सदस्य करून घ्यावे असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात शिवलिंगाप्पा किन्नूर म्हणाले, येणार्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी एकावन सदस्यीय कार्यकारणीचे संघटना सर्व आघाडीचे लवकरात लवकर बांधनी करून राष्ट्रीय कार्यालयाला कळवावे. तसेच प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोगाकडे पक्ष नोंदणी कागदपत्रे देवून नोंद करावी असे सांगितले. १९ एप्रिल २०२६ ला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचा वाढ दिवस आहे, या वाढ दिवसाचे व महाराणी अहिल्याबाई यांची त्रि शताब्दी वर्षाची दिल्ली येतील कार्यक्रमाचे औचित्य साधून निधी संकलनासाठी १ एप्रिल २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत त्याग मुर्ती महादेव जानकर यांचा वाढदिवसा निमित्ताने कमीत कमी त्यांच्या वयाच्या ५८ व्या वाढदिवसा इतके हजाराच्या अथवा लाखाच्या पटीत मदत निधी देवून पक्ष मजबूत करावे. तसेच सर्व राज्यातील कार्यकारणीची फेर निवड करून नुतन कार्यकारणीचे अहवाल राष्ट्रीय कार्यालयात पाठवावे असे सूचना शिवलिंगाप्पा किन्नूर यानी कार्यकर्त्यांना दिले.

या बैठकीत तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष पदी रमेश डोडामणी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी काशिनाथ शेवते यांची निवड करण्यात आली. तसेच पक्ष प्रवेश करण्यात आला, तेलंगणा उद्योगपती विरशेट्टी बिरादार, निवृत अभियंता आंबादास बाबुशेट्टे, प्रा. नागनाथ महागावे यानें राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. या बैठकिला राष्ट्रीय कार्य कारणी सदस्य व रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिगंबर राठोड, यांची प्रमुख उपस्थित होती तसेच तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्रातील कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. बैठकीचे आयोजन व प्रस्तावना राष्ट्रीय मुख्य महासचिव बालकृष्ण लेंगरे यानी केले तर आभार राष्ट्रीय सचिव गोविंदराम शूरनर यानी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande