
बीड, 25 मार्च (हिं.स.)।
आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान, मायंबा येथे गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या अलोट गर्दीत कायदा व सुव्यवस्था उत्कृष्टरीत्या राखल्याबद्दल पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अंभोरा ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भागवत साळवे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. मायंबा गडावर
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अंदाजे १० ते १२ लाख भाविक दर्शनासाठी आले होते. मोठ्या संख्येने जनसमुदाय असताना शांतता राखणे आणि गर्दीचे नियोजन करणे हे पोलिस प्रशासनासमोर आव्हान होते. सपोनि मंगेश साळवे आणि त्यांच्या पथकाच्या योग्य नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता आले. प्रभावी समन्वय आणि सतर्कतेमुळे संपूर्ण बंदोबस्त शांततेत पार पडला. याबद्दल पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पत्राद्वारे कौतुक करुन समाजामध्ये बीड पोलिसांच्या कामगिरीबाबत जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis