
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)।
गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या रामनवमी उत्सवानिमित्त पैठण शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शहर भगवे झेंडे व भगव्या झालरने सजविण्यात आल्याने शहरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील बसस्थानक परिसर,
खंडोबा चौक, मुख्य बाजारपेठ, मेन रोड, भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, संभाजी महाराज चौक आदी परिसरात रामभक्तांनी भगवे ध्वज, पताका, भगवे बॅनर लावले आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते भगवामय झाले आहेत. गुरुवारी (ता. २६) ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. रामभक्तांनी शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन केले असून, गुरुवारी सायंकाळी सहाला राम मंदिरापासून श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार असल्याचे श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis