कोल्हापूर - बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन
कोल्हापूर, 25 मार्च, (हिं.स.)। महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मार्फत राबविण्यात येणाऱ्या नवतेजस्विनी - महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा अंतर्गत बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री 27 ते 29 मार्च या कालावधीत
कोल्हापूर - बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन


कोल्हापूर, 25 मार्च, (हिं.स.)। महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मार्फत राबविण्यात येणाऱ्या नवतेजस्विनी - महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा अंतर्गत बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री 27 ते 29 मार्च या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दैवज्ञ बोर्डिंग, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

माविम अंतर्गत स्थापन झालेल्या बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 27 मार्च रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी मंगेश पवार, जिल्हा अग्रणी बँक, आशुतोष जाधव, सहाय्यक महाव्यवस्थापक, नाबार्ड, डॉ. विद्यासागर गेडाम, गुळ संशोधन केंद्र व कुंदन शिनगारे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, माविम हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवात माविम अंतर्गत एकूण 40 बचत गटांचे स्टॉल्स सहभागी होणार असून महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. यासोबतच महिलांना उद्योग व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी विविध शासकीय विभागांकडून मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक

कार्यक्रमांचाही समावेश आहे.

या महोत्सवाची सांगता 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजता होणार असून, नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन बचत गटांच्या उत्पादनांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन माविमच्या अधिकाऱ्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande