एसआयटीच्या झाडाझडतीनंतर खरातच कार्यालय सील
After SIT raids, office sealed
एसआयटीच्या झाडाझडतीनंतर खरातच कार्यालय सील


सीए - पत्नीला कोणत्या क्षणी चौकशीची नोटीस, गुन्ह्यांची संख्या झाली आठ

नाशिक, 26 मार्च (हिं.स.)।

- भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता एसआयटीकडे पोलीस कस्टडी आल्यानंतर एसआयटीच्या पथकाने बाबाच्या कॅनडा कॉर्नर येथील ऑफिसची झाडाझडती घेतली यामध्ये काही साहित्य जप्त करण्यात आले असून हे कार्यालय सील करण्यात आले आहे. दुसरीकडे याबाबत आता नवीन गुन्हा दाखल झाला असून त्या दृष्टिकोनातूनही तपास होणार आहे या सर्व प्रकरणांमध्ये अजून काही लोकांना चौकशीला बोलवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खरातवर लैंगिक अत्याचार, हनी ट्रॅप, काळा पैसा पांढरा करणे, खुनाचे आरोप, शेतकऱ्यांना धमकावणे, जमिनी बळकावणे, गावाचा निधी वळवणे, शेतकऱ्यांचे पाणी पळवणे, काळ्या जादूची भीती, बुवाबाजी या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोंदू बाबा अशोक खरात याला 18 मार्च रोजी सरकारवाडा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तलयाच्या गुन्हे शाखेने अटक केली होती त्यानंतर या बाबाची कष्टडी ही नाशिक पोलीस आयुक्तालय कडे होती पण यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणांमध्ये लक्ष घालून महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या एसआयटी पथकाची स्थापना केली त्यानंतर पुढील तपासाला अधिक गती मिळाली.

या सर्व प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे दरम्यान विशेष पोलीस पथकाला 24 तारखेला न्यायालयाने कष्टडी दिल्यानंतर पोलिसांनी अजून तपासाची गती वाढवली असून एसआयटीच्या पथकाने भोंदू बाबाचा कार्यालय असलेल्या ओजस प्रॉपर्टी या ठिकाणी गुरुवारी झाडाझडती घेतली त्या ठिकाणी सर्व तपासणी करण्यात आली यावेळी जागेवरती फोरेंटिक्स लॅब ची गाडी देखील उपस्थित होती. या ठिकाणी सर्व तपास करण्यात येऊन हे कार्यालय गुरुवारी दुपारी एसटीच्या पथकाने सील केल्याचे घोषित केले आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये आता महसूल विभाग आपल्या पद्धतीने बाबाच्या नावावरती असलेल्या जमिनी आणि झालेल्या व्यवहाराच्या शोध घेत आहे हे सर्व घेत असताना खरातला मदत करणाऱ्या अजून काही जणांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये विशेष करून खरात बायको आणि त्याचा सीए या दोघांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या दोघांनाही कोणत्याही क्षणी चौकशीला बोलवण्यात येण्यास असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणावरती आता तपास सुरू असतानाच अजून एक नवीन गुन्हा दाखल झालेला आहे आता या खरात वरती दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ही आठवर पोहचली आहे. दृष्टिकोनातून अधिक तपास आता सुरू झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande