बिअर बारवर चोरट्यांचा डल्ला; रोकडसह विदेशी दारू लंपास
जळगाव , 26 मार्च (हिं.स.) जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाणे रोड परिसरात एका बिअर बारमध्ये धाडसी फोडी झाल्याची घटना समोर आली आहे अमोल गोपाळ साळी (वय ३९, रा. राजराजेश्वरी अपार्टमेंट, जळगाव) यांचे आव्हाणे रोडवरील ‘हॉटेल न्यू नाईट किंग अँड
बिअर बारवर चोरट्यांचा डल्ला; रोकडसह विदेशी दारू लंपास


जळगाव , 26 मार्च (हिं.स.) जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाणे रोड परिसरात एका बिअर बारमध्ये धाडसी फोडी झाल्याची घटना समोर आली आहे अमोल गोपाळ साळी (वय ३९, रा. राजराजेश्वरी अपार्टमेंट, जळगाव) यांचे आव्हाणे रोडवरील ‘हॉटेल न्यू नाईट किंग अँड वाईन पॅलेस’ या बिअर बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास प्रवेश करून चोरी केली. दुकान बंद असताना ही घटना घडली. चोरट्यांनी हॉटेलच्या खिडकीचे लोखंडी ग्रील वाकवून आत प्रवेश केला आणि काउंटर तसेच स्टोअरमधून सुमारे १५ हजार ८३० रुपये किमतीच्या विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या चोरून नेल्या. सकाळी दुकान उघडल्यानंतर ही बाब लक्षात आली आणि चोरीचा प्रकार उघड झाला.या प्रकरणी हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande