खालापूर टोलनाक्यावर थांबलेल्या एसटीत चोरी; प्रवाशाच्या बॅगेतून 2.14 लाखांचे दागिने लंपास
रायगड, 26 मार्च (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत खालापूर टोलनाक्याजवळील फूडमॉल परिसरात उभी असलेल्या एसटी बसमध्ये चोरीची घटना घडली असून, प्रवाशाच्या बॅगेतून सुमारे 2 लाख 14 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने खळबळ उडाली आ
Theft in ST stopped at Khalapur toll plaza; Jewelry worth Rs 2.14 lakhs stolen from passenger's bag


रायगड, 26 मार्च (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत खालापूर टोलनाक्याजवळील फूडमॉल परिसरात उभी असलेल्या एसटी बसमध्ये चोरीची घटना घडली असून, प्रवाशाच्या बॅगेतून सुमारे 2 लाख 14 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी व त्यांची पत्नी कुसुम हे दोघे परळ (मुंबई) येथून नागठाणे (सातारा) येथे जाणाऱ्या एसटी बसने प्रवास करत होते. बस खालापूर टोलनाक्याजवळील फूडमॉल येथे थांबली असताना दोघेही बाथरूमसाठी खाली उतरले.यावेळी त्यांनी आपली निळ्या रंगाची ट्रॅव्हल बॅग बसमधील सीटखाली ठेवली होती. त्या बॅगेतील हिरव्या पिशवीत ठेवलेले सुमारे 2.14 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने संधी साधून चोरून नेले.या घटनेनंतर प्रवाशांनी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 106/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत. दरम्यान, बस प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande