मणिपूर : कुकी दहशतवाद्यांचा सैन्य चौकीवर गोळाबारी
इम्फाल, 26 मार्च (हिं.स.) : मणिपूरमध्ये कुकी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या दहशतवाद्यांनी आज, गुरुवारी सकाळी 11.40 वाजता फौलजांग आणि गोथोल परिसरात फौगाकचाओ अवांग लीकाई येथे असलेल्या भारतीय सैन्य चौकीवर गोळाबार केला. मणिपूर पोलिसा
प्रतिकात्मक छायाचित्र


इम्फाल, 26 मार्च (हिं.स.) : मणिपूरमध्ये कुकी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या दहशतवाद्यांनी आज, गुरुवारी सकाळी 11.40 वाजता फौलजांग आणि गोथोल परिसरात फौगाकचाओ अवांग लीकाई येथे असलेल्या भारतीय सैन्य चौकीवर गोळाबार केला.

मणिपूर पोलिसांच्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य आणि केंद्रीय राखीव पोलिसांच्या (सीआरपीएफ) बटालियनने त्वरित प्रत्युत्तरात गोळाबारी केली. हा गोळीबार सुमारे 30 मिनीटे सुरू होता. पोलिसांनी सांगितले की, 26 मार्च रोजी सकाळपासून भारतीय सैन्य, सीआरपीएफ, मणिपूर पोलिस आणि भारतीय राखीव बटालियन (आयआरबी) यांनी हल्ला झालेल्या परिसरात आणि आसपासच्या डोंगराळ भागात संयुक्त कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा दल सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत असून, परिसरातील डोंगराळ भागात आपली कारवाई चालू ठेवतील.

त्याचबरोबर, मणिपूरमध्ये सुरक्षा दलाने पटसोई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या एका सक्रिय सदस्याला अटक केली आणि इन्फाल पश्चिम जिल्ह्यातील सहा बेकायदेशीर बंकर नष्ट केले. या कारवाईदरम्यान, अटक केलेल्या व्यक्तीकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील कायदा-व्यवस्था सामान्य होती. सुरक्षा दल सीमावर्ती आणि संवेदनशील भागात शोधमोहीम सुरू ठेवली आहे. दरम्यान 25 मार्चला लिटान आणि मोंगकट चेपू ऊपरी गाव परिसरातील 6 बेकायदेशीर बंकर नष्ट करण्यात आले. ऑपरेशननंतर हिंसाचारग्रस्त लिटान परिसरातील अनेक बंकर्स निष्क्रिय करण्यात आले. सुरक्षा दल सतत सतर्क असून, परिसरात हिंसा थोपवण्यासाठी सैनिकांना तैनात केले आहेत.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande