
नवी दिल्ली , 26 मार्च (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत. अमेरिकेतील डेटा अॅनालिटिक्स संस्था मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदींना ६८ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली असून त्यामुळे ते जगातील अव्वल नेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहेत.
२ ते ८ मार्चदरम्यान मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी आपल्या जागतिक समकक्षांपेक्षा मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचे दिसून आले. सलग तिसऱ्यांदा सत्तेत असूनही त्यांची लोकप्रियता आणि मजबूत नेतृत्व कायम असल्याचे या क्रमवारीतून स्पष्ट होते. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या यादीतील टॉप-१० मध्ये स्थान मिळू शकले नाही आणि त्यांना केवळ ३९ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली.
पंतप्रधान मोदींनंतर दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांचा क्रमांक लागतो. या दोघांनाही ६२-६२ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे झेक प्रजासत्ताक आणि अर्जेंटिनाचे नेते असून त्यांना अनुक्रमे ५७ आणि ५६ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली.इतर जागतिक नेत्यांबाबत बोलायचे झाल्यास, ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांना २४ टक्के तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांना केवळ १७ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली असून ते यादीत खूप मागे राहिले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अलीकडेच भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळाचा एकत्रित कालावधी ८,९३१ दिवसांवर पोहोचला असून ते देशातील सर्वाधिक काळ सेवा देणारे प्रमुख ठरले आहेत. मॉर्निंग कन्सल्टची ही रेटिंग विविध देशांतील प्रौढ नागरिकांच्या मतांवर आधारित सात दिवसांच्या ‘मूव्हिंग अॅव्हरेज’ पद्धतीने तयार केली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode