पश्चिम आशिया संकट : पंतप्रधान उद्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाइन बैठक घेणार
नवी दिल्ली, 26 मार्च (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, २७ मार्च रोजी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे निवडणूक असलेल्या राज
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 26 मार्च (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, २७ मार्च रोजी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार नाहीत. या राज्यांच्या मुख्य सचिवांसाठी एक स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल, जी कॅबिनेट सचिवालयामार्फत घेतली जाईल.

या बैठकीत तयारीवर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामध्ये पुरवठा साखळी, ऊर्जा सुरक्षा आणि परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असेल. पंतप्रधान 'टीम इंडिया'च्या भावनेतून सामूहिक प्रतिसादाचे महत्त्व अधोरेखित करतील आणि केंद्र व राज्यांमध्ये समन्वय सुनिश्चित करतील अशी अपेक्षा आहे.

२४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत सांगितले होते की, जर अमेरिका-इस्रायलचे इराणसोबतचे युद्ध सुरूच राहिले, तर त्याचे विपरीत परिणाम होतील. येणारा काळ देशासाठी एक मोठी परीक्षा असेल. राज्यांचे सहकार्य आवश्यक आहे. आपण सर्वांनी टीम इंडिया म्हणून काम केले पाहिजे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande