पळसपमध्ये रविवारी साहित्य जागर रंगणार
छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.)। ग्रामीण संस्कृती आणि साहित्याचा वारसा जपणारे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन रविवारी (ता. २९) पळसप (ता. धाराशिव) येथे होणार आहे. शिक्षणमहर्षी वसंतराव काळे यांच्या विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त ''स्वर्गीय अजितदादा
पळसपमध्ये रविवारी साहित्य जागर रंगणार


छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.)। ग्रामीण संस्कृती आणि साहित्याचा वारसा जपणारे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन रविवारी (ता. २९) पळसप (ता. धाराशिव) येथे होणार आहे. शिक्षणमहर्षी वसंतराव काळे यांच्या विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त 'स्वर्गीय अजितदादा पवार साहित्यनगरी' मध्ये हे अकरावे संमेलन होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश सावंत (नांदेड) हे संमेलनाध्यक्ष आहेत.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सकाळी साडेदहाला संमेलनाचे उद्घाटन होईल. माजी मंत्री संजय बनसोडे, प्रा. फ. म. शहाजिंदे, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रवीण स्वामी आदी उपस्थित

असतील. वसंतराव काळे यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या संमेलनास साहित्यप्रेमी, वाचक, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय आणि राष्ट्रवादी शिक्षक संघाने केले आहे.

दिवसभर भरगच्च कार्यक्रम

रविवारी सकाळी आठला जयकुमार शितोळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे, तर

सकाळी दहाला डॉ. घ. ना. पांचाळ यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. चित्रकार शिवाजी हांडे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिक राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी दीडला 'बदलते ग्रामीण जीवन' या विषयावर प्रा. गंगाधरराव हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र रंगेल. दुपारी तीनला सत्यशिला तौर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन, साडेचारला प्रा. जिजा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. रात्री आठला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संमेलनाची सांगता होईल.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande