जळगाव - मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; 10 एप्रिल प्रवेशाची अंतिम तारीख
जळगाव, 28 मार्च, (हिं.स.) अनुसूचित जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर, जि.जळगाव यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, हे
जळगाव - मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; 10 एप्रिल प्रवेशाची अंतिम तारीख


जळगाव, 28 मार्च, (हिं.स.) अनुसूचित जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर, जि.जळगाव यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, हे प्रशिक्षण १ एप्रिल २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत एकूण साडेतीन महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षण सत्राच्या प्रवेशाची अंतिम तारीख 10 एप्रिल,2026 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या प्रशिक्षणामध्ये विविध शासकीय व निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची सखोल तयारी करून घेतली जाणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान पात्र प्रशिक्षणार्थींना उपस्थितीनुसार दरमहा रु. १०००/- विद्यावेतन देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. प्रशिक्षणास प्रवेश मिळविण्याकरिता www.roigar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवासी, किमान दहावी उत्तीर्ण व त्याचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट फोटो व जातीचा दाखला (आवश्यक) यांसह मूळ व छायांकित प्रती सादर कराव्यात. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व भोजनाची व्यवस्था उमेदवारांनी स्वतः करावयाची आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २, शनि मंदिरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५८४-२५१९०६ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande