चंद्रपूरमध्ये इरई नदी खोलीकरण अभियानाचा दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
चंद्रपूर, 28 मार्च (हिं.स.) : चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात शनिवारी इरई नदीचे खोलीकरण अभियान राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. अभियानाचा दुसऱ्या टप्प्याचा काम आ
चंद्रपूर : असा आहे खोलीकरण कामाचा दुसरा टप्पा :


चंद्रपूर, 28 मार्च (हिं.स.) : चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात शनिवारी इरई नदीचे खोलीकरण अभियान राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. अभियानाचा दुसऱ्या टप्प्याचा काम आता निश्चित करण्यात आले आहे.

इरई नदी चंद्रपूर शहराजवळ नऊ किलोमीटर लांब वाहते. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात सन 2026 मध्ये चौराळा पूल ते माना टेकडी या चार किलोमीटर लांबीवर खोलीकरणाचे काम केले जाणार आहे. यामध्ये 2 लाख 80 हजार टीसीएम गाळ काढण्याचे नियोजन आहे.गतवर्षी 2025 मध्ये पहिल्या टप्प्यात रामसेतू पूल ते चौराळा पूल या अडीच किलोमीटर लांबीवर एकूण 82.61 टीसीएम गाळ काढले गेले होते. खोलीकरण अभियानामुळे शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यास तसेच पूर जोखमी कमी करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande