चंद्रपुरात साकारली विश्वविक्रमी मानवी साखळी
चंद्रपूर, 28 मार्च, (हिं.स.)। अवघ्या जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी चंद्रपूरातील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स च्या वतीने शनिवारी स्थानिक वडगाव येथील संस्थेच्या परिसरात किमान सुमारे १ हजार ३८१ विद्यार्थ्यांच्या सहभागातून जगातील सर्वात मोठे मानवी
चंद्रपुरात साकारली विश्वविक्रमी मानवी साखळी-


चंद्रपूर, 28 मार्च, (हिं.स.)। अवघ्या जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी चंद्रपूरातील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स च्या वतीने शनिवारी स्थानिक वडगाव येथील संस्थेच्या परिसरात किमान सुमारे १ हजार ३८१ विद्यार्थ्यांच्या सहभागातून जगातील सर्वात मोठे मानवी साखळीने 'जागतिक शांतता चिन्ह' साकारले गेले.

या अभूतपूर्व उपक्रमाची नोंद थेट 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम जगातील सुमारे १८० देशांमध्ये प्रसारित केला गेल्याने चंद्रपूरचे नाव जागतिक नकाशावर पुन्हा एकदा झळकले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande