
छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ टिचर्स असोसिएशन (बामुक्टा) छत्रपती संभाजीनगरची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी डॉ. विश्वनाथ कोक्कर तर सचिव म्हणून डॉ. गणेश मोहिते यांची निवड करण्यात आली.
संघटनेची बैठक देवगिरी महाविद्यालयात झाली. या वेळी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीवर कोषाध्यक्ष डॉ. किरण पानझाडे, उपाध्यक्ष डॉ. सचिन मोरेडॉ. युसूफ पठाण यांची तर सहसचिव डॉ. बी. के. मगरे. केंद्रित कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. शिवाजी यादव, डॉ. विकास देशमुख, डॉ. मनिषा पवार. तालुका प्रतिनिधी म्हणून डॉ. सादेक शेख, डॉ. अंकुश जाधव, डॉ. बलभीम पाटील, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुधीर पवार, डॉ. दीपक निकम, डॉ. बळीराम धापसे, डॉ. अर्जुन मोरे आदींची निवड झाली. अध्यक्ष डॉ. भारत खंदारे, संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजी मदन, डॉ. विलास खंदारे, डॉ. बाबा सलामपुरे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis