
छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद विषय समिती सभापतींची निवडणूक गुरुवारी सकाळी दहाला जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबत सुधारित आदेश दिले. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली. त्यानंतर १५ दिवसांत विषय समिती सभापतींची निवड करणे आवश्यक असते. त्यानुसार ही विशेष
सभा दोन एप्रिलला आहे. कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना मदतीसाठी वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. सभेसाठी एक तृतीयांश सदस्य संख्या आवश्यक आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आलेले सदस्यच मतदान करु शकतील, सभापतीपदाचे अर्ज सभेपूर्वी दोन तास आधी स्वीकारले जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis