
लातूर, 28 मार्च (हिं.स.) – उदगीर येथील स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाने नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा आणि उपसभापती यांचा सन्मान सोहळा आयोजित केला. या समारंभाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भाऊसाहेबांसोबत राजकीय चळवळीमध्ये कार्य करणाऱ्या व त्यांच्या कुटुंबीयांचा आदर व्यक्त करणे.
संस्थेचे चेअरमन भरतभाऊ चामले, व्हा. चेअरमन शंकरराव पाटील व सर्व संचालक यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. कार्यक्रमात पुण्यात्मा स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले.समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांचा स्नेह सत्कार केला गेला. त्यानंतर उपसभापती पं. स. देवणी, नियोजन सभापती शहाजी भगवानदादा पाटील तळेगावकर आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित संघाचे अध्यक्ष भरत तुकाराम चामले, उपाध्यक्ष शंकरराव रामचंद्रराव पाटील, संचालक किशनराव हारमुंजे, विठ्ठलराव मुळे, बाबासाहेब काळेपाटील, वसंतराव सोनकांबळे, प्रभाकर पाटील, विजयकुमार बिरादार, वामनराव मोटेवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब नवाडे यांनी केले तर आभार वसंतराव सोनकांबळे यांनी मानले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis