
नाशिक, 28 मार्च (हिं.स.) | अंजनेरी येथे ‘ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’च्या वतीने अंध विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातील निवासी शाळा व कौशल्य विकास कार्यशाळेच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात झाले. कुंभमेळा व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
मंत्री महाजन यांनी हा उपक्रम स्तुत्य असून शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल, तसेच वीज व रस्त्यासारख्या सुविधा लवकर उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. ही शाळा प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास राजीव खांडेकर, स्वामी कंठानंद, आमदार हिरामण खोसकर, हरीश बैजल, संपत सकाळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अरुणजी भारस्कर यांनी केले. २७,५०० चौ.फुट क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान (एआय) वापरून शाळा उभारली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राजीवज खांडेकर यांनी उपक्रमाचे कौतुक करत समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. आमदार हिरामणजी खोसकर यांनी आमदार निधीतून रस्ता करण्याची घोषणा केली. स्वामी कंठानंद यांनी विद्यार्थ्यांकडून देशाचे नाव उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी विश्वास गायकवाड, सौ. विजया मराठे, प्रवीण पारीक यांचे सहकार्य लाभले. तसेच विठ्ठल भाडमुखे, दिनेश मुसळे, हिरामण टिळे, राजीव व्यास,भावना गायकवाड, प्रतिभा होळकर, रेचल शिरसाठ, दत्तात्रय पाटील यांनी योगदान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV