सोलापूरला १०० इलेक्ट्रिक बस मिळणार; बुधवार पेठेत चार्जिंग स्टेशन अंतिम टप्प्यात
सोलापूर, 28 मार्च (हिं.स.) : नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत १०० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले चार्
smc


सोलापूर, 28 मार्च (हिं.स.) : नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत १०० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन बुधवार पेठेत उभारण्यात आले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

महापालिकेला मिळणाऱ्या या १०० बसपैकी १० बस महिलांसाठी विशेष राखीव असणार आहेत. ‘पिंक बस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बस महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनमध्ये एकाच वेळी २० बस चार्ज करता येणार असून, बस उभ्या करण्यासाठी स्वतंत्र पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक बैठक व्यवस्थेच्या खोल्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे.

दरम्यान, या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ३० इलेक्ट्रिक बस मे महिन्यात महापालिकेला प्राप्त होणार असून, त्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande