निरा खोऱ्यात धरणे तुडुंब; उन्हाळ्यातही शेतीला पाण्याची चिंता नाही
पुणे, 28 मार्च (हिं.स.)। निरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, निरा देवधर आणि वीर या धरणातून सतत कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू असून, वीर धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या ऐन उन्हाळ्यात शेतीला व पिण
निरा खोऱ्यात धरणे तुडुंब; उन्हाळ्यातही शेतीला पाण्याची चिंता नाही


पुणे, 28 मार्च (हिं.स.)। निरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, निरा देवधर आणि वीर या धरणातून सतत कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू असून, वीर धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या ऐन उन्हाळ्यात शेतीला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नसल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे.

निरा खोऱ्यातील धरणांमध्ये सध्या सरासरी 55.76 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे शेतकरी वर्गाला उन्हाळी पिके घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जीवनदायिनी असलेल्या निरा नदीवरील गुंजवणी, भाटघर, निरा देवधर व वीर धरणाचा खूप मोठा आधार राहिलेला आहे. याच धरणातील पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी बाराही महिने तरकारी पिके तसेच फळबागा घेऊन आपली उन्नती साधली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande