
छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील
पेट्रोलपंपांवरील वाहनधारकांची अचानक गर्दी वाढल्याने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करुन पेट्रोल डिजेल मर्यादीत करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि, डिजेल व पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इंधन निर्बंधाच्या आदेशाची आवश्यकता नसल्याने आधीचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे आदेश पुरवठा विभागाने जारी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis