पाचोरा येथे २ एप्रिलला रोजगार व समुपदेशन मेळावा; उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
जळगाव, 28 मार्च (हिं.स.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह
पाचोरा येथे २ एप्रिलला रोजगार व समुपदेशन मेळावा; उमेदवारांसाठी सुवर्णसंधी


जळगाव, 28 मार्च (हिं.स.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे.

मेळाव्याचे ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सारोळा रोड, पाचोरा, जि. जळगाव येथे निश्चित करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल, युवा शक्ती फाउंडेशन आणि भार्दवाज नेटवर्क सोल्यूशन प्रा. लि. यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी तसेच पदवीधर (बी.कॉम., एम.कॉम. इत्यादी) पात्रता असलेले इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह मेळाव्याच्या दिवशी थेट उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५) भेट द्यावी किंवा ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande