“इन्स्ट्रुमेंट्स इंटेंडेड फॉर द क्यूअर ऑफ सर्जिकल डिसिस” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
रायगड, 28 मार्च (हिं.स.)। : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या “इन्स्ट्रुमेंट्स इंटेंडेड फॉर द क्यूअर ऑफ सर्जिकल डिसिस” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे हे पुस्तक तब्बल ७ आंतरराष्ट्रीय भा
Publication of the book “Instruments Intended for the Cure of Surgical Diseases”; written in 7 international languages


रायगड, 28 मार्च (हिं.स.)। : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या “इन्स्ट्रुमेंट्स इंटेंडेड फॉर द क्यूअर ऑफ सर्जिकल डिसिस” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे हे पुस्तक तब्बल ७ आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यामुळे जागतिक स्तरावरही विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

हे पुस्तक अलिबाग येथील को. ई. सो. चंद्रकांत हरी केळुस्कर महाविद्यालयाचे प्राचार्य, होमिओपॅथिक तज्ञ तसेच सर्जरी विषयाचे प्राध्यापक डॉ. आशिष अशोक भगत आणि सातारा येथील सावकार होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. श्वेता राहुल बागडे यांनी संयुक्तपणे लिहिले आहे. वैद्यकीय साधने आणि होमिओपॅथीच्या अभ्यासाचे सुलभ आणि समजण्यास सोपे मार्गदर्शन या पुस्तकातून करण्यात आले आहे.

अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित “आम्माकॉन 2026” या कार्यक्रमात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या पुस्तकाबाबत बोलताना डॉ. देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, “वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार असून, त्यातील छायाचित्रे, विश्लेषण आणि सहाय्यक उपाय विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील. तसेच हे पुस्तक एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ म्हणूनही उपयोगी पडेल.”

प्रकाशन सोहळ्यास अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव भगत, सातारा येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. राहुल बागडे, डॉ. अनघा भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोप्या, आकलनीय आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केलेले हे पुस्तक निश्चितच ज्ञानवृद्धीस हातभार लावणारे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande