भुयारी मेट्रोच्या सुरक्षेसाठी पुणे महापालिकेची नवी नियमावली
पुणे, 28 मार्च (हिं.स.)। कुपनलिकेचे काम करताना थेट मेट्रोच्या भुयारी मार्गाला छिद्र पडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. त्याची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्तांकडून आता भुयारी मेट्रोच्या मार्गाच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी नवीन नियम
Metro Train


पुणे, 28 मार्च (हिं.स.)। कुपनलिकेचे काम करताना थेट मेट्रोच्या भुयारी मार्गाला छिद्र पडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. त्याची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्तांकडून आता भुयारी मेट्रोच्या मार्गाच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी नवीन नियमावली केली जाणार आहे. त्यामुळे जुन्या इमारती आणि वाड्यांच्या पुनर्विकासाचे काम व कूपनलिकेच्या कामासाठी महापालिकेची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील शुक्रवार पेठेतील खडक पोलिस ठाण्यासमोरील एका वाड्यामध्ये कूपनलिकेचे काम सुरू होते. खोदकाम करताना भुयारी मेट्रो मार्गास छिद्र पडले. त्यामुळे स्वारगेट-पिंपरी-चिंचवड या मेट्रोच्या भुयारी मार्गातून पाणी गळती सुरू झाली. या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाने घरमालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ या घटनेची महापालिकेनेही गांभीर्याने दखल घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande