पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणे, 28 मार्च (हिं.स.)। पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज सकाळी शिवाजीनगर पोलिस मुख्यालायतील मैदानावर ही घटना घडली. एक हजार ६०० मीटर धावण्याची चाचणी देत असताना अचानक त्याला ‘फिट’ आली. मैदानात बेशुद्ध होऊ
पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू


पुणे, 28 मार्च (हिं.स.)। पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज सकाळी शिवाजीनगर पोलिस मुख्यालायतील मैदानावर ही घटना घडली. एक हजार ६०० मीटर धावण्याची चाचणी देत असताना अचानक त्याला ‘फिट’ आली. मैदानात बेशुद्ध होऊन कोसळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृ्त्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर दलातील भरती प्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयातील मैदानावर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. आज सकाळी मैदानी चाचणी सुरू झाली. पुरुषोत्तम हा मैदानी चाचणीत सहभागी झाला. भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावण्याच्या चाचणीसाठी पुरुषोत्तम याने मैदानाला दोन फेऱ्या मारल्या. तिसऱ्या फेरीत अचानक त्याला अपस्माराचा झटका (फिट) आली. तो धावताना मैदानावरच कोसळला. त्याच्याबरोबर असलेल्या उमेदावारांच्या लक्षात हा प्रकार आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande