येवल्यात रंगली सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांची कव्वाली महफिल
येणाऱ्या पिढ्यांपर्यंतही ऐक्याचा संदेश पोहोचविणे आवश्यक- समीर भुजबळ येवला, 28 मार्च (हिं.स.) | येवला शहराने नेहमीच सामाजिक सलोखा, सौहार्द आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली आहे.अशा कार्यक्रमांमुळे ही एकतेची भावना अधिक दृढ होते. येणाऱ्या पिढ्यांपर्
Qawwali gathering of famous


येणाऱ्या पिढ्यांपर्यंतही ऐक्याचा संदेश पोहोचविणे आवश्यक- समीर भुजबळ

येवला, 28 मार्च (हिं.स.) | येवला शहराने नेहमीच सामाजिक सलोखा, सौहार्द आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली आहे.अशा कार्यक्रमांमुळे ही एकतेची भावना अधिक दृढ होते. येणाऱ्या पिढ्यांपर्यंतही बंधुभाव,सहिष्णुता आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. तर सण-उत्सव हे समाजाला जोडणारे, आपुलकी वाढवणारे राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारे सेतू असल्याचे प्रतिपादन आमदार पंकज भुजबळ यांनी केले.

पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला भव्य ‘ईद मिलन समारंभ’ व सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांची कव्वाली महफिल अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला येवलेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येवला शहरातील पोलीस परेड ग्राउंड, अँग्लो उर्दू हायस्कूलजवळ सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सामाजिक सलोखा, बंधुभाव, प्रेम आणि एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. रमजान ईदच्या पावन पार्श्वभूमीवर विविध समाजघटक, नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमस्थळी उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल मुस्लीम बांधवांच्या वतीने सामुहिक रित्या माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande