
छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.)। घरगुती गॅस सिलिंडरसाठी गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना एजन्सीबाहेर रांगा लावव्या लागत आहे. बुकिंग करूनही लवकर सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. हीच बाब लक्षात घेता शहरातील प्रत्येक म्हणजेच २३ गॅस एजन्सीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक संवर्गातील एक कर्मचारी कार्यालयीन वेळेत बसून राहील असे नियोजन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आखले आहे.
एजन्सीकडील साठा, ग्राहकांच्या बुकिंगपासून ते सिलिंडरचे वितरण यावर महसूल कर्मचाऱ्यांची करडी नजर असणार आहे. हा कर्मचारी नागरिकांच्या समस्या काय आहेत, याची पाहणी करणार आहे.
जिल्हाभरात ११ लाख ७७ हजार गॅस सिलिंडरधारक ग्राहक आहेत. यामध्ये एचपीसीएलचे दोन लाख ४० हजारापेक्षा अधिक, तर बीपीसीएलचे तीन लाख ४० हजारापेक्षा अधिक आणि आयओसीएलचे तीन लाख ६० हजारांहून अधिक ग्राहक आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis