सोलापूर झेडपी शाळांमधील २०० शिक्षक अतिरिक्त
सोलापूर, 28 मार्च (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता झाली आहे. त्यात पटसंख्येअभावी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील
school


सोलापूर, 28 मार्च (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता झाली आहे. त्यात पटसंख्येअभावी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे २०० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्या सर्वांचे एप्रिलमध्ये तालुकास्तरावर समायोजन होणार आहे. तत्पूर्वी, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध होणार आहे.

दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीत शिक्षकांच्या बदल्या होत होत्या. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत होता. त्यामुळे आता १५ जूनपूर्वीच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. तत्पूर्वी, संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. पहिल्यांदा तालुकास्तरावर समायोजनाची प्रक्रिया पार पडेल. उर्वरित शिक्षकांचे जिल्हास्तरावर आणि पुन्हा विभागीय स्तरावर समायोजन होईल. त्यानंतर बदलीपात्र शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande