परभणी जिल्ह्यात लॉन टेनिस आणि कुस्तीसाठी विभागीय क्रीडा निपुणता केंद्राची निवड चाचणी
परभणी, 28 मार्च (हिं.स.) । क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्यामार्फत “मिशन लक्ष्यवेध” योजनेअंतर्गत लॉन टेनिस आणि कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र, विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात येण
विभागीय प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी -पात्र खेळाडूंनी अर्ज करण्याचे आवाहन

परभणी, 28 मार्च (हिं.स.) । क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्यामार्फत “मिशन लक्ष्यवेध” योजनेअंतर्गत लॉन टेनिस आणि कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र, विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात येणार आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी सांगितले की, पात्र खेळाडूंनी आपले अर्ज ६ एप्रिलपर्यंत ऑफलाईन स्वरूपात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी, जिल्हा क्रीडा संकुल, स्टेशन रोड, परभणी येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

लॉन टेनिससाठी पात्रता:

वयोमर्यादा: २५ वर्षाखालील मुले-मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी)

आवश्यक कागदपत्रे: जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील २ वर्षातील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो ३, शाळा/महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालक संमती पत्र

क्रीडा कामगिरी विवरण: AITA टॉप रँक, राष्ट्रीय रँक, राज्यस्तरीय पदक किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभाग

वैद्यकीय फिटनेस: शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैध प्रमाणपत्र अनिवार्य

कुस्तीसाठी पात्रता:

वयोमर्यादा: २५ वर्षाखालील मुले-मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी)

आवश्यक कागदपत्रे: जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील २ वर्षातील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो ३, शाळा/महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालक संमती पत्र

क्रीडा कामगिरी विवरण: राज्यस्तरीय पदक किंवा राष्ट्रीयस्तरावरील सहभाग

वैद्यकीय फिटनेस: शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैध प्रमाणपत्र अनिवार्य

जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी जास्तीत जास्त खेळाडूंना निवड चाचणीत सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande