
नाशिक, 28 मार्च (हिं.स.)।
: उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध किम्स मानवता हॉस्पिटलच्या किम्स कड्ल्स (आई व बाळ विभाग) येथे अत्याधुनिक प्रसूतीपूर्व, प्रसूती, प्रसूतीनंतरची काळजी व पुनर्वसन या सर्व सेवा एकाच ठिकाणी देणाऱ्या सर्वसमावेशक कक्षाचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राज नगरकर, डायरेक्टर सौ. डॉ. प्रार्थना नगरकर आदी सह अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.
या कक्षामुळे प्रसूतीच्या सर्व टप्प्यांतील सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असून रुग्णाला वेगवेगळ्या विभागांत हलवण्याची गरज राहत नाही. त्यामुळे मातांचा ताण कमी होऊन अनुभव अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आत्मविश्वासपूर्ण ठरतो. तसेच सामान्य प्रसूतीची शक्यता वाढण्यास मदत होते.
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रणिता संघवी यांनी सांगितले की, गर्भवती महिलांसाठी दर महिन्याला मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते. या सत्रांमध्ये आहार, तपासण्या, जीवनशैली, वेदनारहित प्रसूती, नवजात बाळाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. ‘प्रेग्नेंसी मॉडिफाइड कपल झुंबा’सारख्या उपक्रमांमुळे पालकांचा सहभाग वाढतो. गेल्या सात महिन्यांत १५० हून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. गेल्या वर्षभरात किम्स कड्ल्समध्ये २५० हून अधिक यशस्वी प्रसूती झाल्या असून त्यामध्ये जुळी गर्भधारणा, आयव्हीएफ तसेच इतर उच्च-जोखीम प्रकरणांचा समावेश आहे.
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रणिता संघवी यांनी सांगितले की, न्यूक्लियर फॅमिली संस्कृतीमुळे गर्भवती महिलांना अनेक शंका निर्माण होतात. यासाठी किम्स कड्ल्समध्ये दर महिन्याला मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते. या सत्रांमध्ये योग्य आहार, तपासण्या, जीवनशैली, पेनलेस डिलिव्हरी, नवजात बाळाची काळजी आणि स्तनपान याविषयी सविस्तर मार्गदर्शन दिले जाते. यामध्ये ‘ ‘प्रेग्नेंसी मॉडिफाइड कपल झुंबा’ सारख्या उपक्रमांमुळे पालकांचा सक्रिय सहभाग वाढतो, तसेच सातव्या महिन्यातील डोहाळे जेवणासारखे उपक्रम सकारात्मक वातावरण निर्माण करतात. गेल्या सात महिन्यांत १५० हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला आहे.
किम्स कड्ल्समध्ये मातृत्वाकडे भावनिक आणि आनंददायी प्रवास म्हणून पाहिले जाते. अत्याधुनिक सुविधा, अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग आणि २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यामुळे उच्च-जोखीम गर्भधारणा सुरक्षितपणे हाताळता येतात.
- डॉ. राज नगरकर, मॅनेजिंग डायरेक्टर
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV