छ. संभाजीनगर - जिल्हा परिषदेच्या चार सभापतींची २ एप्रिलला होणार निवड
छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या चार सभापतींची येत्या २ एप्रिलरोजी निवड होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेली नाचक्की पुसून काढण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून केला जाणार आहे, त
छ. संभाजीनगर - जिल्हा परिषदेच्या चार सभापतींची २ एप्रिलला होणार निवड


छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या चार सभापतींची येत्या २ एप्रिलरोजी निवड होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेली नाचक्की पुसून काढण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून केला जाणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व अपक्षांना सोबत घेत भाजप शिवसेनेला पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धवसेनेतील फूट कायम राहते का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपद, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या तीन, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच,

तर दोन अपक्षांना सोबत घेत भाजपने बाजी मारली होती. उद्धवसेनेचे नऊपैकी सहाजण शिंदेसेनेसोबत होते. मात्र, अध्यक्षपद मिळत नसल्याचे बघून त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे प्रथमच अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाली होती. पालकमंत्र्यांसह खासदार, सहा आमदार असलेल्या शिंदेसेनेला नामुष्की सहन करावी लागली होती. अध्यक्षपदासाठी खा. संदिपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांच्यात मतभेद उफाळले होते.

सभापतीपदाच्या निवडणुकीपर्यंत

मतभेद कायम राहिल्यास पुन्हा

भाजपला फायदा होऊ शकतो. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बांधकाम अर्थ, शिक्षण आरोग्य, महिला बालकल्याण आणि समाजकल्याण या चार सभापतीपदांसाठी येत्या दोन

एप्रिलरोजी सकाळी दहा वाजता निवडणूक होणार आहे. कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत त्यांना सहाय्य करतील.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande