परभणी–जिंतूर महामार्गावर पुल बांधकामामुळे वाहतूक वळविण्यात
परभणी, 28 मार्च (हिं.स.) : परभणी–जिंतूर महामार्गावरील विसावा नाक्याजवळील कालव्यावर नवीन पुलाच्या बांधकामामुळे रविवारी (दि. 29 मार्च) सकाळी 6 वाजता ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिंतूर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाईल. विसावा कॉर्नर लगतच्या
परभणी–जिंतूर महामार्गावर पुल बांधकामामुळे वाहतूक वळविण्यात


परभणी, 28 मार्च (हिं.स.) : परभणी–जिंतूर महामार्गावरील विसावा नाक्याजवळील कालव्यावर नवीन पुलाच्या बांधकामामुळे रविवारी (दि. 29 मार्च) सकाळी 6 वाजता ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिंतूर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाईल.

विसावा कॉर्नर लगतच्या कालव्यावरील पुलाचे बांधकाम एमएसआरडीसी लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर आणि पीएसके रिथविक जे.व्ही. या कंपनीद्वारे केले जात आहे. या कामामुळे या मार्गावरील दैनंदिन हलकी व अवजड वाहतूक पाथरी रस्त्यावरील बाह्य वळण मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जिंतूरकडे जाणारी तसेच जिंतूरहून परभणीकडे येणारी सर्व वाहने या पर्यायी मार्गाचा वापर करतील. वाहनधारकांनी सूचनांचे पालन करून वाहतूक सुरळीत राखण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande