उजनीतील सात टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित
सोलापूर, 28 मार्च (हिं.स.)। उजनी धरणातील सात टीएमसी पाणी उन्हाळी हंगामात पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे निश्चित करण्यासह पिण्यासाठी मे महिन्यात भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासह ग्रामीण पाणीपुरवठा यो
ujani dam news


सोलापूर, 28 मार्च (हिं.स.)। उजनी धरणातील सात टीएमसी पाणी उन्हाळी हंगामात पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे निश्चित करण्यासह पिण्यासाठी मे महिन्यात भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासह ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निश्चित करण्यासाठी पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर, लाभक्षेत्र विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी, जीवन प्राधिकरण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande