पुणे - वरंधा घाट ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद
पुणे, 28 मार्च (हिं.स.)। महाड-भोर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील महाड ते भोरदरम्यान असलेला वरंधा घाट रस्त्याच्या कामासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणासाठी ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचा आदे
पुणे - वरंधा घाट ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद


पुणे, 28 मार्च (हिं.स.)। महाड-भोर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील महाड ते भोरदरम्यान असलेला वरंधा घाट रस्त्याच्या कामासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणासाठी ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.घाटातील हिर्डोशी ते वरंधा घाटातील (कि. मी. ७०/९०० ते ९२/००३) या २१ किलोमीटर अंतराच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हे क्षेत्र हे दरडप्रवण क्षेत्र आहे. सदर जागेवरील परिस्थितीनुसार रस्त्याच्या हिर्डोशी ते वरंधा या घाट लांबीमध्ये बऱ्याच ठिकाणी वेडीवाकडी धोकादायक वळणे आहेत.

२१ किलोमीटर अंतरापैकी साडेतीन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.मात्र, उर्वरित लांबीमध्ये एका बाजूला नीरा-देवघर धरणाचे बॅकवॉटर (पाणलोट क्षेत्र) व दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने वाहतूक वळविण्यासाठी अपेक्षित रुंदी मिळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय या मार्गावरील काही भाग हा वनविभागाच्या हद्दीतून आहे. त्याच्या मंजुरीसाठी वनविभागाचे नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी अर्ज दाखल केलेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande