
सोलापूर, 28 मार्च (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. माळशिरसचे माजी आ. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांची समाज कल्याण समिती सभापतिपदी निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील यांना शह देण्याची खेळी भाजपने खेळली आहे. सातपुते या दहिगाव गटातून निवडून आल्या आहेत.
कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतिपदी रामप्पा चिवडशेट्टी यांची निवड करण्यात आली. ते होटगी जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत. आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख यांच्याशी समान अंतर ठेवून त्यांनी सभापतिपद मिळविले. महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी टेंभुर्णी गटातून विजयी झालेल्या ॲड. अमृता नागनाथ वाघे यांची निवड करण्यात आली. वाघे यांच्या रूपाने माजी आ. बबनदादा शिंदे गटाला संधी मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड