रत्नागिरी पोलीस अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांकडून ई-गव्हर्नन्स उपक्रमांबद्दल गौरव
रत्नागिरी, 28 मार्च (हिं. स.) : दीडशे दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान व सांस
रत्नागिरी जिल्हा  पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.


रत्नागिरी, 28 मार्च (हिं. स.) : दीडशे दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते.

अधिकार्‍यांच्या कार्यालयाचे संकेतस्थळ, ई-ऑफीस, व्हॉटसअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता, भौगोलिक माहिती प्रणाली आणि ब्लॉगचेन वापर या सात घटकांवर मूल्यांकन करण्यात आले. राज्यातील ३४ सर्वोत्तम पोलीस अधीक्षकांमध्ये रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत पाचवे स्थान मिळवले.

श्री बगाटे यांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवत नागरिक सुरक्षेसाठी मिशन प्रतिसाद, मिशन जीवन, रेड्स ॲप, बंदोबस्त ॲप, मिशन फिनिक्स, रत्नसेतू चॅटबॉट, मिशन गती, डिजिटल गाववारी अशा २४ नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.

उदाहरणार्थ, मिशन जीवन अंतर्गत ५०,८०३ एकाकी ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित करून त्यांच्या वाढदिवसांचे अभिनंदन केले जाते. रेड्स ॲप एआय तंत्रज्ञानाद्वारे फरार आरोपी व हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात मदत करते, तर बंदोबस्त ॲप कार्यक्रम व संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त व्यवस्थापन सुलभ करते. मिशन फिनिक्स अंतर्गत ७० आरोपींना अटक करण्यात आली आणि ३२ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त झाला.

याशिवाय, मिशन गती अंतर्गत प्रलंबित गुन्ह्यांचा जलद निपटारा केला जातो, मिशन संवेदना महिला व बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांचे ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल करतो, तर डिजिटल गाववारी कार्यक्रम गावांचे सांस्कृतिक व ऐतिहासिक दस्तऐवज सुरक्षित ठेवतो.

पोलीस अधीक्षक श्री बगाटे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी पोलीस प्रशासनाने नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास वाढवला असून, त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे राज्य शासनाने गौरव केले आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande