मुंबईत २७ गॅस सिलिंडर चोरीला, पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई, 29 मार्च (हिं.स.)। कांदिवली (पश्चिम) परिसरात एका डिलिव्हरी टेम्पोतून 27 एलपीजी सिलेंडर चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. ही चोरी चारकोप परिसरात घडली आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या
मुंबईत २७ गॅस सिलिंडर चोरीला, पोलिसांकडून तपास सुरू


मुंबई, 29 मार्च (हिं.स.)। कांदिवली (पश्चिम) परिसरात एका डिलिव्हरी टेम्पोतून 27 एलपीजी सिलेंडर चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. ही चोरी चारकोप परिसरात घडली आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे गॅस पुरवठ्याबाबत आधीच चिंता व्यक्त केली जात असताना, या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

डिलिव्हरीमन नंदकुमार रामराज सोनी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, 25 मार्च रोजी त्यांनी आपल्या घराजवळील काका केनी चौक येथे एलपीजी सिलेंडरने भरलेला टेम्पो उभा केला होता. 26 मार्च रोजी ते परत आले असता टेम्पोच्या खिडकीचे काच फुटलेले आणि मागील बाजूचे कुलूप तोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी एफआयआरच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, वाहनामध्ये एकूण 27 गॅस सिलेंडर होते आणि ते सर्व चोरीला गेले. यापैकी पाच सिलेंडर भरलेले तर 22 रिकामे होते. चोरट्यांनी अत्यंत हुशारीने ही चोरी केली असल्याचे समोर आले आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये काही संशयित व्यक्ती आणि वाहने दिसून आली आहेत. त्यांच्या ओळखी पटवण्याचे काम सुरू आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande