
देशभरात जवळपास ९० हजार शाखा : मोठ्या संख्येने तरुण जोडले जात आहे
लातूर, 29 मार्च (हिं.स.)।
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्याला शंभर वर्ष पुर्ण झाले. या शंभर वर्षाच्या काळात संघाने सर्व समाजघटका पर्यंत जाण्याचा समाज संघटीत करण्याचा प्रयत्न केला असुन, अनेक गोष्टी झाल्या कांही राहील्या त्या पुर्ण करण्यासाठी संघाने समाजाच्या संवादासाठी संपर्कासाठी पंच परिवर्तनाचे सुत्र समाजा समोर ठेवले असुन त्या निमित्ताने गाव वस्ती पातळीपर्यंत हिंदु संमेलने होत असल्याची माहिती रा.स्वं सेवक संघाच्या पश्चीम क्षेत्र (महाराष्ट्र गोवा गुजरात) प्रचार प्रमुख प्रमोदजी बापट यांनी लातूरात पत्रकारांच्या संवाद बैठकीत बोलताना दिली. यावेळी जिल्हा प्रचार प्रमुख सीए जगदीश तोष्णीवाल यांनी प्रास्ताविक केल.
यावेळी लातूर विभागसंघचालक सीए संजय अग्रवाल, शहरसंघचालक उमाकांत मद्रेवार यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रमोदजी बापट म्हणाले की, संघाच्या कामात मोठ्या संख्येने तरुण जोडला जात आहे वेब साईटच्या माध्ममातुन महिन्याला सरासरी पस्तीस हजार इतके
वेबसाईटच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला जवळपास ३५ हजार नवीन सेवक जोडले जात आहे
संघाला स्वतःच्या संघटन शक्ती पेक्षा समाज संघटन हे महत्वाचे असल्यामुळे संघाने विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाजाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याला समाजातील सज्जन शक्ती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. देशभरात संघाच्या जवळपास ९० हजार शाखा असुन महाराष्ट्रात सहा हजार शाखा आहेत तसेच साप्ताहिक मिलन आणि मासिक मिलनाच्या माध्यमातुन संघकाम होत आहे. संघाच्या संघटन आणि सेवेची १०० वर्ष हे व्यापक गृहसंपर्क अभियानाच्या माध्यमातुन भारतभर घरोघरी माहिती दिली जात आहे. समाजातील प्रमुख नागरिकांच्या एकत्रीकरणातुन संगोष्ठी
सारखे कार्यक्रमाचे आयोजन केल जात आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समाजातील विविध वर्ग आणि संघटन यांच्या सोबत सद्भावना बैठकाचे आयोजन केले जात आहे. व्यापक प्रमाणावर समाज संघटील व्हावा म्हणुन गाव, प्रभाग पातळीवर हिंदु संमेलनाचे आयोजन होत असुन समाज प्रबोधन केले जात आहे. संघाच मुख्य काम व्यक्ती निर्माणाचे आहे असे सांगुन या शताब्दी वर्षात पंचपरिवर्तनाचे सुत्र मांडले आहे. या पंचपरिवर्तना मध्ये सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्व आधारित जिवन, नागरिक कर्तव्य याचे समाजाने स्वतः च्या जिवनात अचरण करावे यासाठी जनप्रबोधन केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis