भोंदू बाबा अशोक खरातला एक एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी
नाशिक, 29 मार्च (हिं.स.)।भोंदू बाबा अशोक खरात याला रविवारी न्यायालयाने एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे त्यामुळे आता अजून तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भोंदू बाबा अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी महिलांचे लैंगिक शोषण करणे त
Kharat in police custody till


नाशिक, 29 मार्च (हिं.स.)।भोंदू बाबा अशोक खरात याला रविवारी न्यायालयाने एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे त्यामुळे आता अजून तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भोंदू बाबा अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी महिलांचे लैंगिक शोषण करणे तसेच फसवणूक करणे यासह विविध कलमांच्या अंतर्गत 18 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर 24 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी होती. पोलीसांनी खरात याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवस म्हणजे 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली होती . आज रविवारी खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मधून खरातला काही काळ न्यायालयात अन्य पूर्वी न्यायालयात असलेल्या गर्दीच्या कारणामुळे परिमंडळ एक पोलीस उपायुक्त त्यांच्या कार्यालयात थांबविण्यात आले होते ज्यावेळी न्यायालयाची गर्दी कमी झाली आणि खरात यांचा केसचा नंबर आला त्यावेळी त्याला पोलीस उपायुक्त कार्यालयातून न्यायालयात आणण्यात आले सुट्टी कालीन विशेष न्यायालयात त्याला हजर करण्यात आले.

पोलिसांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना सरकारी पक्षाचे वकील अजय मिसर यांनी आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगून तपास अजून करणे बाकी आहे. तसेच आरोपीच्या मोबाईलचा डाटा पोलिसांना मिळाला असून त्यामध्ये कोणाचे नंबर काय नावाने आहेत याचा देखील तपास करावयाचा आहे यासह विविध मुद्दे मांडले . त्यामुळे पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली त्यावर खरात यांच्या वकिलांनी हरकत घेत सरकारी पक्ष म्हणजेच पोलिसांकडे नवीन कोणतेही मुद्दे नाही त्याच मुद्द्यांवरती ते पोलीस कोठडी मागत आहे ते चुकीचे असून आरोपी खरात याला पोलीस कुठेतरी देऊ नये म्हणून विरोध केला तर यातील पीडित महिलेच्या वकिलांनी देखील युक्तिवाद करताना खरात च्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने सर्वांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर काही काळ एकूण तपासाच्या दिशेवरती अभ्यास केला आणि नंतर आपला निर्णय घेताना खरात ने केलेला गुन्हा हा गंभीर आहे यातील तपासासाठी एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घोषित केला.

खरातला नव्याने पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिस आता नव्याने काय माहिती समोर आणतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande