भादवणला बिबट्याचा हल्ला; शेळ्या मृत्युमुखी
कळवण, 29 मार्च, (हिं.स.)। कळवण तालुक्यातील भादवण येथील श्रीरामनगर वस्तीवर पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतकरी ग्यानदेव दामू खैरनार यांच्या गट क्रमांक २१७ मधील राहत्या घराशेजारील गोठ्यात घुसून पाच शेळ्यांचा फडशा पाडला. नुकसानग्रस्
भादवणला बिबट्याचा हल्ला; शेळ्या मृत्युमुखी


कळवण, 29 मार्च, (हिं.स.)। कळवण तालुक्यातील भादवण येथील श्रीरामनगर वस्तीवर पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतकरी ग्यानदेव दामू खैरनार यांच्या गट क्रमांक २१७ मधील राहत्या घराशेजारील गोठ्यात घुसून पाच शेळ्यांचा फडशा पाडला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाकडून तातडीने नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

रविवारी (दि.२९) सकाळी गोठ्यात जनावरांना चारा देण्यासाठी खैरनार गेले असता त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने उपसरपंच अतुल जाधव यांना घटनेची माहिती दिली. जाधव यांनी कळवण वनविभागाशी संपर्क साधला. त्यानुसार वनरक्षक हेमराज बागुल, तलाठी राजेंद्र गरुड, महसूल सेवक पंकज बच्छाव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून मृत शेळ्यांचा पंचनामा केला. गेल्या वर्षभरात या भागात बिबट्यांचा उपद्रव झपाट्याने वाढत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande