
छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रिक्षा चालकांनी संप पुकारला असून सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अचानक रिक्षा बंद झाल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामावर जाणारे नागरिक, विद्यार्थी आणि रुग्ण यांचे हाल झाले. इंधन दर कमी करावा तसेच भाडेवाढ लागू करावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis