डोंबिवली : निळजे ग्रामस्थांचे रेल्वे प्रशासनाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन
डोंबिवली, 29 मार्च (हिं.स.)।रेल्वे क्रॉसिंगसाठी जुन्या रेल्वे फाटकापासून ये-जा करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी निळजे ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा प्रश्न प्
Photo1


डोंबिवली, 29 मार्च (हिं.स.)।रेल्वे क्रॉसिंगसाठी जुन्या रेल्वे फाटकापासून ये-जा करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी निळजे ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून रेल्वे प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. परिणामी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या आंदोलनात प्रकाश पाटील, डॉ.रमेश पाटील, तुकाराम पाटील, शरद पाटील, मुकुंद पाटील, बळीराम पाटील, पंढरीनाथ पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

याबाबत निळजे ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार सध्या उपलब्ध असलेला पर्यायी मार्ग गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे ज्येष्ठ, महिला तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्वांची गैरसोय होत आहे. मुख्य म्हणजे पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचत असते. तेव्हा वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. पूर्वी रेल्वे फाटकाचा मार्ग येथील ग्रामस्थांना सोयीचा होता पण तो बंद करण्यात आला त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

याविषयी निळजे ग्रामस्थांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला. डीआरएम यांचीही भेटही घेतली तरी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अखेर 28 मार्चपासून ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी शनिवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा नक्की करणार.

या आंदोलनात प्रकाश पाटील, डॉ.रमेश पाटील,तुकाराम पाटील,शरद पाटील,मुकुंद पाटील,बळीराम पाटील,पंढरीनाथ पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande