टीव्हीके प्रमुख विजयने केली तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा
चेन्नई, 29 मार्च (हिं.स.)।अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय यांच्या तमिळगा वेट्री कळगम (टीव्हीके) पक्षाने आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. अभिनेता विजय स्वतः पेरम्बूर आणि तिरुची पूर्व या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणा
टीव्हीके प्रमुख विजयने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी केली उमेदवारांची घोषणा


चेन्नई, 29 मार्च (हिं.स.)।अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय यांच्या तमिळगा वेट्री कळगम (टीव्हीके) पक्षाने आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. अभिनेता विजय स्वतः पेरम्बूर आणि तिरुची पूर्व या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत. सध्या या दोन्ही जागांवर डीएमकेचा ताबा आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील सर्व २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याआधी टीव्हीके प्रमुख विजय यांनी आज उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. विजय यांनी उमेदवारांची घोषणा करताना जनतेला टीव्हीके ला एक संधी देण्याचे आवाहन केले. मतदारांनी त्यांच्या आणि इतर टीव्हीके उमेदवारांमध्ये कोणताही भेदभाव करू नये, तसेच पक्षातील सर्व उमेदवार समान असल्यावर त्यांनी भर दिला.

टीव्हीकेने कोलातूर मतदारसंघातून व्ही.एस. बाबू यांना उमेदवारी दिली असून ते मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. तसेच चेपॉक मतदारसंघातून सेल्वम यांना उमेदवारी देण्यात आली आहे, जिथे त्यांचा सामना उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्याशी होणार आहे.

पक्षातील वरिष्ठ नेते आणि विजय यांच्या अंतर्गत टीममधील सदस्य — एन. आनंद, अधव अर्जुन, आर. अरुणराज, सीटीआर निर्मल कुमार आणि के.ए. सेंगोट्टैयन — यांना टी नगर, विल्लिवक्कम, गोबिचेट्टीपलायम आणि तिरुप्परंकुंद्रम यांसह विविध मतदारसंघांत टीव्हीकेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande