अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक खरातला खुले आव्हान
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : हिंदू धर्मातील अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी काम करणाऱ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अनिस) कथित ज्योतिषी अशोक खरात याला आव्हान दिले आहे. खरातने दैवी शक्ति सिद्ध करून दाखवल्यास 80 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे अनिसने
अमरावतीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक खरातला खुले आव्हान


अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : हिंदू धर्मातील अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी काम करणाऱ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अनिस) कथित ज्योतिषी अशोक खरात याला आव्हान दिले आहे. खरातने दैवी शक्ति सिद्ध करून दाखवल्यास 80 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे अनिसने म्हंटले आहे. तसेच खरात हे सिद्ध करू शकला नाही तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील अनिलसने केलीय. अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांचे शोषण केल्याचे आरोप समोर आले असून या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विज्ञान आणि तर्कावर विश्वास ठेवणाऱ्या समाजात दैवी शक्तींचे दावे करून लोकांना घाबरवणे किंवा फसवणे योग्य नाही. त्यामुळे खरातने आपल्या कथित शक्तींचे वैज्ञानिक पद्धतीने परीक्षण करून दाखवावे. जर तो हे सिद्ध करू शकला नाही, तर लोकांची दिशाभूल केल्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या आंदोलनामुळे अमरावतीत पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून पुढे अशोक खरात याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच पोलिस आणि प्रशासन या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत असल्याची माहितीही समोर येत आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande